Ad will apear here
Next
‘ए. जी. पाटील अभियांत्रिकी’च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे सुयश
कोमल घाटेसोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत सन २०१६मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीची परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला. 

हीना सैफन इनामदार (सिव्हिल इंजिनीअरिंग) हिने ९.५६ एवढा सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कोमल घाटे (कम्प्युटर इंजिनीअरिंग) हिने ९.३३ सीजीपीए मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. मोहनीश कांबळे याने ९.१४ सीजीपीए मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. बेसिक सिव्हिल इंजिनीअरिंग या विषयाचा निकाल १०० टक्के लागला.

हीना इनामदारया वेळी संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सेक्रेटरी एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार, सर्व विभागप्रमुख यांनी १०० टक्के रिझल्ट लागल्याबद्दल प्रा. पी. एस. स्वामी यांचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मोहनीश कांबळे
‘प्रथम वर्ष हे अभियांत्रिकी शिक्षणात खूप महत्त्वाचे असते. त्याकरिता महाविद्यालयात विशेष परिश्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांना सेमिनार, मिनी प्रोजेक्टसाठी उद्युक्त केले जाते. तसेच विद्यापीठाने दिलेल्या योजनेनुसार सर्व कृती केल्या जातात,’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील यांनी दिली.

याकरिता प्रथम वर्षाचे समन्वयक प्रा. आर. बी. कुलकर्णी आणि प्रथम वर्षाला शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PYVVBD
Similar Posts
ए.जी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम सोलापूर : महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून प्रत्येक जुलै महिन्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. या उद्देशाने २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात योगदिन साजरा सोलापूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी जीवन तणावग्रस्त होत आहे. या तणावातून मुक्ती मिळविण्याचा सोपा उपाय म्हणजे योग. योगाभ्यास हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. मानवी दीर्घायुष्याची, तसेच निरोगी तणावमुक्त आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे. याचा प्रसार व्हावा म्हणून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा सोलापूर : बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेने सोलापूरमधील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विशाखा परुळेकर व सुमित शिर्के यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language